या वेळेस सवाईमध्ये काही फोटो काढायला मिळाले. फार वेळ जाउ नये म्हणून काहीही संस्कार न करता ते फोटो इथे टाकतेय.
पहिल्या दोन दिवशी फोटो काढलेले चालतील असे वाटले नव्हते, त्या मुळे कॅमेराच नेला नव्हता. अन शेवटच्या दिवशी घाईत कॅमेराची बॅटरी चार्ज करायलाच विसरले. त्यामुळे काही कलाकारांचे फोटो नाही घेता आले.
या वेळेस स्टुडन्ट पास मिळाल्याने खुप पुढुन अनुभवायला मिळाला कार्यक्रम. अन त्याच मुळे फोटोही काढता आले. शिवाय सकाळच्या सेशन्सलाही फोटो काढायची परवानगी मिळाल्याने तिथलेही फोटो काढता आले.
मला फ्लॅश वापरायला अजिबात आवडत नाही, शिवाय फार पळापळ करून फोटो काढायलाही आवडत नाही. कलाकाराला अजिबात डिस्टर्ब न करता, आपल्या जागेवर बसूनच फोटो काढायचे हा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे अनेक बंधने येतात, फोटो अगदी खुप मनासारखे नाही मिळत . पण मी अल्पसंतुष्ट आहे
आशा आहे तुम्हालाही आवडतील हे फोटो. ( सगळ्यांच्या उपाध्या नक्की माहिती नाही म्हणून फक्त नावं लिहितेय, क्षमा करावी )
यात कद्री गोपालन अन व्यंकटेशकुमार यांचे फोटो नाहीत याचे फार फार वाईट वाटतय.
उस्ताद अब्दूल करीम खां साहेब
सवाई गंधर्व
भीमसेन जोशी
अजय पोहनकर
विकास कशाळकर
अजय पोहनकर
रोणू मुझुमदार
प्रभा अत्रे
योजना शिवानंद
सुयोग कुंडलकर
श्रीनिवास जोशी
माऊली टाकळकर
मालिनी राजुरकर
उडिपी या छोट्या गावातील 'नृत्य निकेतन'या गृपमधील कलाकार
शमा भाटेंच्या विद्यार्थीनी
विजय घाटे
अमजद अलि खाँ
तंबोरे तयार करणारे मिरजकर
दादरकर
पद्मा देशपांडे
नागराज हवालदार आणि त्यांची दोन मुले
No comments:
Post a Comment