Sunday, August 4, 2013

ढगांच्या राज्यात

जूनच्या सुरवातीलाच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. कित्येकदा ठरवूनही जाणे जमले नव्हते. अखेर अगदी दिड दिवसांसाठी जाता आले.
पुण्यातून निघालो तेव्हा ब-यापैकी ऊन होते परंतू वाटेत हवा बदलत गेली. मधूनच लांबवर ढगांनी दर्शन द्यायला सुरुवात केली.



वाटेतल्या या देवळाने मन वेढून घेतले. चालत्या गाडीतूनच क्लिक करण्याचा मोह आवरला नाही



 अचानक एका वळणावर समोरचा छोट्याशा घाटाचा रस्ता फार सुरेख दिसला. खरे तर पावसाचे थेंब गाडिच्या काचेवर होते, तरी मोह झालाच

 

राजगुरू नगर नंतर आम्ही चुकून एका छोट्याशा वाटेला वळलो. पण चुकलो हे फार छान झाले. अतिशय सुरेख, मांडून ठेवल्या सारख्या छोट्या छोट्या गावांनी आमचे स्वागत केले. एका नंतर एक सुबक गाव, गावं कसली २०-२५ घरांच्या वस्त्या, त्यांची शेतं, गावानजीकच्या छोट्याशा नद्या, प्रत्येक गावानंतर लागणारी छोटीशी टेकडी, सारेच कसे स्वपनवत. त्या रस्तावर आम्ही इतके गुंगून गेलो की क्लिक कराचेही भान राहिले नाही. आता फार हळहळ वाटते, पुन्हा मुद्दाहून तिथून जावेच आता .

बराच लांबचा पण फार सुरेख वळसा घालू आम्ही भिमाशंकरच्या ब्लू मोरान ला पोहोचलो. अतिशय सुरेख, शांत रिसॉर्ट !
आमचे स्वागत याने केले.



सारे भिमाशंकर ढगांच्या दुलईत बसलेले. धुकं, नाही ढग ! अगदी ८ फुटावरचेही दिसत नव्हते. शनिवारचा पूर्ण दिवस ढगांच्या राज्यात आम्ही पार हरवून गेलो.





अक्षरशः आमच्यापासून ५-६ फुटावरचा हा कुत्रा इतका अंधूक दिसत होता




हे आमचे कॉटेज





मग रात्रभर पाऊस मस्त कोसळला. अन सकाळी जराशी उघडिप झाली. मग काल जे फोटो काढले तेच फोटो पुन्हा काढले. दोन्हीतला फरक लक्षात येईल एव्हढा



दुस-या दिवशी पाय निघत नव्हता पण इलाज नव्हता. निरोप घेऊन आम्ही निघालो.

Friday, September 14, 2012

चेहरा

हा अ‍ॅनिमेशनच्या कोर्स मध्ये शिल्पकला  शिकताना शाडूच्या मातीपासून केलेला एक चेहरा.
 
परीक्षेत याला १०० पैकी १०० गुण मिळाले होते :)

 

Saturday, September 8, 2012

फोटोशॉपमध्ये काढलेली काही चित्र

भीमसेनजी

 
 
 
 

नूतन


 
 

माधुरी दिक्षित

 
 

Wednesday, September 5, 2012

काही पेन्सिल स्केचेस

 

मधुबाला

 
 
 
 
 

डान्सर


 
 
 

वादळ



 
 

चैतन्य


 
 
 

राखी


 
 

शर्मिलाचे डोळे